Tuesday, July 27, 2010

स्वर्ग…

 
आज मंद वार्‍यातुनी वाजते बासरी
सख्या हाय गात्रांतुनी धुंद ही शिरशिरी

निरवताही डोलते वारियाच्या सवे
तुझ्या स्वरांसवे धरा छेडिते सतारी

रंग सृष्टीचे बघ जाहले कृष्ण निळे
अन व्योमात सामावूनी उरला श्रीहरी

हरिच्या सुरांतुनी मनी प्रित झिरपते
तयांसवे डोलते मुग्ध राधिका लाजरी

खुळावल्या गोपिका रास वृंदावनी
जिभ वेडावूनी बघ चिडवितो मुरारी

अंतर गगनधरेतले गेले विरघूनी
चांदण्यात अवतरे स्वर्ग यमुनातीरी

विशाल

No comments:

Post a Comment