Monday, July 12, 2010

” प्रिया “

कृष्णसावळ्या केसांवरती
कण वर्षेचा क्षण रेंगाळे ,
काजळडोही चमकता मोती
पाहुनी चन्द्रही मनी जळे !!
नागिणीसम तव बटा सळसळे
कुठे पाहावे डोळा न कळे,
उगाच लटका भाव नयनी
जाणुनीया परि मनही चळे !!
सखे तुझी ती मोहक कांती
नवतीचेही मग भान गळे ,
पामर मी तव लावण्यापुढती
प्रीत तुझी नच मला गमे !!
तुझ्यात विरघुनी गेलो सखये
विसरलो घटीका न पळे ,
कधीच गेलो हरवुनी नयनी
प्रिये, माझे मला न कळे !!
विशाल

No comments:

Post a Comment