Thursday, July 8, 2010

आमी बी कविता करतो…

म्हनलं चला आपणपण कविता पाडू
तर तेनी म्हनले ‘लय’ नका तोडू…!
नायतर शब्दांन्ला नसंल शब्दांचा पायपोस
आम्ही म्हनू याला शब्दाचा लई सोस..,
आशय नसेल तर कुणाचं काय जातं?
सुद्धलेखन करताना मन आमचं जळतं,
आम्ही इचारलं हेडर फुटर काय घालू ?
त्येच्या नादात ते बेणं मिटर इसरलू..,
त्ये दादां म्हणत्यात कुटं हाये रे यति ?
यति विना काव्य हीच तं आमची नियती….
अशानं बघा कवितेचं माज्या बारा वाजलं…
कुणी वाचो न वाचो आमी तर वाचलं …!

नवकवि ईशाल म्हमईकर

No comments:

Post a Comment