Thursday, July 22, 2010

तुला पाहता …..

तुला पाहता गेंद गाली फुलावे असे
उगा मोगरीने पहाटे फुगावे असे !

जरासे मला आज हासून तू पाहता
कळीने जुईच्या, मनी हे रुसावे असे !

मला ना कळाले फुलांचे बहाणे सखे
मनी आज माझ्या कळ्यांनी रुतावे असे !

तुझ्या धूंद कैफात बेभान व्हावे सुखे
सवे पाखरांनी फुलांच्या झुलावे असे !

फुलांनीच सामील वार्‍यास व्हावे अता
समीरा..,किती हे कळ्यांनी छळावे असे ?

विशाल.

No comments:

Post a Comment