Tuesday, July 27, 2010

पाहतो आहे ….

 
थांबला आसवांचा पाऊस पापण्यांशी
मी तुझ्या बरसण्याची, वाट पाहतो आहे
 
झगडलो वेदनांशी कोंडुन जाणीवांना
आठवांचा आज प्रिये, थाट पाहतो आहे
 
ओसंडु पाहे कसा गुदमर मनातला
थोपवली भावनांची, लाट पाहतो आहे
 
ओथंबले काठ अता डोळ्यांचे सखे
मोडुनी चौकट वाहे, पाट पाहतो आहे
 
संपले ते उजळणे पुन्हा मनोरथांचे
गातात दु:ख सुखाने, भाट पाहतो आहे
 
विशाल

No comments:

Post a Comment