Friday, July 9, 2010

मर्म ...

भडकलेल्या चितेला
कधी कुणी विचारलंय
……..प्रिये तुझी जात काय?
तेजाळणार्‍या तिच्या ज्योतीला
कधी कुणी विचारलंय
………सखे तुझा धर्म काय?
न टळणार्‍या मृत्युला का
कधी कुणी विचारलंय
………बंधो, तुझं कर्म काय?
हेच एकमेव सत्य आहे..
सत्याला कधी कुणी विचारलंय
……….गड्या रे, तुझं मर्म काय?
  विशाल.

No comments:

Post a Comment