Friday, July 16, 2010

मज वाटे ...

मज वाटे पावसाशी
नाते माझे नित्य असावे
आसवांनी शुष्क माझ्या
पावसात सचैल न्हावे

पांघरुनी पाऊसधारा
हिरवे मी गवत बनावे
क्षणभंगुर जलथेंबाचे
हलकेच तोल सावरावे

हिरवाईचे हळवे स्पंदन
श्वासांनी अलवार टिपावे
मुग्ध ओल्या जाणिवांनी
पावसाचे गाणे शिकावे

पावसात अन भिजताना
हलकेच तुज मनी स्मरावे
ओलेत्या स्मृतीत तुझिया
भान सखे क्षण विसरावे

विशाल.

No comments:

Post a Comment