Friday, July 9, 2010

सल ...

त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न
कधीचा मनात सलतो आहे,
सलता सलता माझ्या अस्तित्वाला,
अलगद कुरतडतो आहे……!!
त्यांच्या त्या वि़खारी नांग्या,
आणि ते दाहक दंश..
माझ्या जाणीवाही खाल्ल्याहेत,
तोडुन , कुरतडून त्यांनी,
हळु-हळु त्यांचा प्रवास माझ्या,
मनापर्यंत येवुन पोचतो आहे.
त्यांच्या अस्तित्वाचा विचार करताना,
मी माझंच असणं जाळतो आहे,
त्यांना संपविणे आवश्यक आहे..!
कारण पिंजरे लावणे, सापळे ठेवणे..
ही सोय आहे तात्पुरती..
मला मात्र कायम त्यांच्या…
पुढच्या पीढीची चिंता सलते आहे.

(पुर्ण केलेली पहिली कविता, इथुन कवितेचे वेड लागले)
विशाल

No comments:

Post a Comment