Thursday, July 22, 2010

बाप…

 
छपराच्या दांडीवरचा
एकाक्ष कावळा
मला बघुन हसला
हळुच म्हणाला
काळा असलो तरी
मी ‘काक’ आहे
पिंडाला शिवण्यापुरता
मी तुझा बाप आहे
आज ना उद्या
तु ही जाशील
पुन्हा कावळे जमतील
आमच्यापैकी नसले
तर तुमच्यातले असतील
तुझ्या जन्मापासुन जमलेले
तुझ्या पिंडावर टपलेले
आमच्यापासुन सुटका नाही
आम्हाला अंत नाही
कारण इथे …..
रोज नवा पिंड असेल
आम्हा कावळ्यांची
रोजच चैन असेल
तु असलास काय
अन नसलास काय
मी मात्र कायम असेन
तुझ्या पिंडावर
कुणाचाही डोळा असला
तरी काक म्हणुन
फक्त माझाच हक्क असेल

विशाल

No comments:

Post a Comment