Monday, July 12, 2010

यल्गार …

आता सोड
तारे मोजायचं..
मोजताना चुकलं की
आपणच हळहळायचं..
ही मोजणी
नेहेमीच चुकणार..
इथे रोजच मृत्युला
नवा घास मिळणार..
बाँब आणि बुलेटस
आपलं प्राक्तन असणार ..
आपलेच हात
आणि आपलेच गळे..
लक्षात ठेव
आपल्याच काळजाला..
आपणच पाळलेल्या
श्वापदांचे सुळे..
ते म्हणतात
आग विझवलीय..
आमच्याच राखेखाली
ठिणगी दडपलीय..
म्हणुन म्हणतो
तारे मोजणं सोड..
राखेखालची ठिणगी शोध
ऐक्याची मार फुंकर..
चेतव वन्ही स्वत्वाचा
आणि कर यल्गार..
नव्या युद्धाचा
अस्तित्वाच्या लढाईचा…!
विशाल

No comments:

Post a Comment