Friday, July 16, 2010

दिव्यातला राक्षस…

समुद्रकिनारी फिरताना,
जुना गंजला दिवा मिळाला
हलकेच घासता दिव्यामधुनी
राक्षसकी हो निघाला
हा हा हा हा ….
विकट हास्य करुन म्हणाला
बोल मेरे आका,
कहा करु तेरा तबादला
तबादला तर कधीच झाला
शोधतो नव्या शहरात दलाला
घर शोधणे झाले मुश्किल
बाबा रे, आता तुझाच हवाला
विषण्ण हसला, हळुच म्हणाला
मालको, जुना जमाना गेला
असते जर सोपे शोधणे
आजकाल प्रामाणिक दलाला
गुलाम तुझा हा असा
असता का गंजल्या दिव्यात राहीला
खारघर, कल्याण नाहीतर
गेलाबाजार एखादा कर्जतला
वन बी एच के नसता का पाहिला.

विशाल

No comments:

Post a Comment