Thursday, July 8, 2010

चारोळी - ३…

तुझं आणि अंधाराचं
नातं मला माहीत नाही
आलास की उजळून निघते
तुझं मात्र माहीत नाही …

****************************

नेहमीसारखाच ….
मी परत आलोय…
नेहमीसारखंच…
तूझी वाट पाहणं…!

****************************

तुलना करणं सोडलय आजकाल
तु येतेस तसाच पाऊसही येतो …
फरक एवढाच ….
तो दरवर्षी परत फिरून येतो …. !

*****************************

दंवबिंदुची क्षणभंगुरता
प्रत्येकाच्या नशिबी नसते…
फाटक्या थेंबाची असहायता..
फक्त त्याचंच प्राक्तन असते …!

******************************

पाऊस बघून चारोळ्यांचा
मलाही भिजावंसं वाटलं…
शब्दांचे रेनकोट पांघरताना..
माझं थेंबांशी मात्र फाटलं…!

******************************

आपलं एकाकी थेंबाशीच जमायचं,
गर्दीत नाही्च मन रमायचं…
फाटका असला तरी…,
ओंजळीत तेवढंच मावायचं..!

******************************

गर्दीत असतानाही
एकटं राहायचं … थेंबासारखं !
ओंजळीत येतानाच
ओघळून जायचं… थेंबासारखं !

*******************************

कविताची वही हरवली
तरी वृत्ती हरवत नसते…
हाती लेखणी घेतली की..
कविता आपोआप स्फुरते !

********************************

तुझं हळुवार थरथरणं
पाऊस भिजल्या…….
अबोल नभाचं अलवार
नखशिखांत शहारणं….!

********************************

विशाल

No comments:

Post a Comment