Friday, July 9, 2010

सावली ...

सुर्याची पिल्ले,
पायावर रेंगाळायला लागली..
माझ्याही नकळत माझी,
झोप मग जागायला लागली..
आळसावलेल्या डोळ्यांनी,
आरक्त क्षितीजा न्याहाळ्ली..
आणि अलगद,
…तुझी आठवण आली.
मग त्या वळणावरची,
पहिली वहिली भेट आठवली.
तुझी पाठमोरी सावली,
वेणीला बसणारे मादक हेलकावे..
तेव्हाही साक्ष होती..
सुर्यकिरणांची,
… आरक्त लाली.
आताशा धुसर होवु लागलीय,
क्षितीजा अन तिची आरक्तताही,
मात्र अजुनही खुणावतेय…
तिथेच रेंगाळलेली..
अजुनी तुझी वाट पाहणारी..
… माझी वेडी सावली.
विशाल.

No comments:

Post a Comment