Thursday, July 8, 2010

खरेसाहेब…माफ़ करा : ४ : दिवस असे की …


ऋण इतुके की कोणी माझा नाही
अन मी कोणाचा नाही …!
सावकारांच्या कर्जाखाली बुडतो…
आयुष्याला तारण ठेवूनी देतो,
या जगण्याचे कारण उमगत नाही..,
या जगणे म्हणवत नाही…..

व्याजाचे हे एकसंधसे तुकडे…
मम छाताडावर नाचे त्याचे घोडे,
या घोड्याला लगाम शोधत आहे,
परि मजला गवसत नाही…..

ऋण इतुके की कोणी माझा नाही
अन मी कोणाचा नाही …!
मी गरीब की मी दुर्दैवी कमनशिबी…
कर्ज चुकवण्या शोधतो शेकडो सबबी,
दुर्दैवाला हजार टाळू बघतो…
परि ते पिच्छा सोडत नाही…

येतो म्हणताना ओठ कापती थोडे…
तू मिटून घे पिल्लांचे माझ्या डोळे,
देहाचे अन मम, पदराला तुझीया
हे ओझे पेलवत नाही …. !

ऋण इतुके की कोणी माझा नाही
अन मी कोणाचा नाही …!

त्या दुर्दैवी जिवांसाठी काहीही करु न शकणारा एक असहाय्य सामान्य माणुस !
ईशल्या देणेकरी

2 comments:

  1. wow....great wishal :) khup sundar :)

    ReplyDelete
  2. अप्रतिम जमलंय विशालदादा ! विदारक सत्य...

    ReplyDelete