Thursday, July 22, 2010

वेदना…

खेळलो मी सुखे तो डाव तुझाच होता
सोसला मी सखे तो घाव तुझाच होता

थांबलेल्या प्रिये त्या तारका आसमंती
भावलेला सखे तो गाव तुझाच होता

संपले मार्ग सारे चांद ही थांबलेला
दाटला जो मनी तो भाव तुझाच होता

बांधले मी अता देऊळ वेड्या मनाचे
बाटल्या जाणिवा तो ….., आव तुझाच होता

अंतरी कोंडल्या दु:खांत जो गूंतलेला
सोडला मी सुखे तो ठाव तुझाच होता

विशाल

No comments:

Post a Comment