Tuesday, July 27, 2010

बाकी ते रुसणेच खरे….!

 तुझे ते लाजणे गालात
आठविता गं रात्र सरे

शब्द ओलावणे ओठात
स्मरण्यां दिवस ना पुरे

तु नसशी कवेत आता
बघ अशांत मन झुरे

बांध वेदनांचा तुटेना
शुष्क डोळ्यांत स्वप्न तरे

मन विसरु पाही तुला
मज सुन्न एकांत सावरे

पुन्हा डोकावणे स्वप्नात
जखमांचे ते भान ना उरे

अन थांबलेले डोळ्यात
आसवांचे वाहते झरे

लटके ओशाळणे तुझे
बाकी ते रुसणेच खरे

विशाल

No comments:

Post a Comment