Monday, July 12, 2010

विरह…

सुरु व्हायची जिथपासुनी
संपुनी गेली तिथेच कहाणी
साक्ष असे या पर्वा सखये
व्याकुळ माझ्या नयनी पाणी
रुचे सुचे नच काही तुजविण
……जीव जडे तुज ठायी सजणी..!
असेन मी अन नसेन मी
असशील तु मम कणोकणी
क्षण क्षण सये तुज स्मरताना
झालो वेडा तुजविण रमणी
रिते जाहले सर्व नभांगण
……जीव जडे तुज ठायी सजणी..!
अंगणातली करुण जुईली
गुदमरली ती रातराणी
सय तुझी क्षण क्षण येइ
खुणावते तव याद पुराणी
जाणे नच मजला तुझे साहवे
……जीव जडे तुज ठायी सजणी..!
विशाल

No comments:

Post a Comment