Thursday, July 22, 2010

आतुर…

जागली रात्र हिरवी
सांज कोवळी लाजली
झोपला गं दिनमणी
चंद्रकला हि फाकली...

काजवे गुज करती
क्षितिजाही सैलावली
धुंदी तव लोचनी
गात्रे सारी मस्तावली...

चाहुल तुझी सजणी
रातराणी धुंदावली
प्राजक्त गातो अंगाई
बघ पश्चिमा उजळली...

सखे रात ही जागवु
चल तनुत आगळी
नको आता दिरंगाई
निद्रा नयनी जागली..!

विशाल

No comments:

Post a Comment