Thursday, July 8, 2010

खरेसाहेब…., माफ़ करा !

(आमी बी पाडलं….  )
आता पुन्हा
कुणीतरी विडंबन करणार ….
आता पुन्हा, आम्ही डोक्यावर हात मारणार
मग आम्ही संगणकासमोर बसणार
मग कुणीतरी विपुत खरड टाकणार
मग आम्ही अजुनच वैतागणार
तरिही खरडी कमी नाही होणार
काय रेsssss देवा …..

विडंबन बघुन आम्ही पेटणार
उगाचच खोड्या काढता, ओरडणार
गुलमोहरावर नवा कप्पा मागणार
मग अ‍ॅडमिन नाही म्हणणार
मग आम्हीही खरडी वाढवणार
अ‍ॅडमिनच्या नावाने खडे फोडणार
तरिही अ‍ॅडमिन नाही ऐकणार
पुन्हा विडंबनाचा मुड नसणार
मग प्रतिसाद देणे बंद करणार
मग आम्हाला अनुल्लेखवाले म्हणणार
पुन्हा आमच्यावर चर्चा होणार …
पुन्हा कुणीतरी विडंबन करणार….
काय रेsssss देवा……

सुरुवातीपासुन माबो चाळायचे ठरवणार
पण ते काही केल्या नाही जमणार
मग एखादी जुनीच कविता टाकणार
मग आमची चोरी पकडली जाणार
परत ते आम्हाला चिडवणार
मग आम्ही कट्ट्यावर परतणार
तिथे तेच तेच चेहरे असणार
मग पुन्हा नवीन विडंबन करणार
काय रे sssss देवा ……

हे असेच चालायचे
विडंबने कालही होती… आजही होताहेत…, उद्याही होणार…!
काय रे देवा …….

(नव इडंबनकार ईरसाल ’खोटे’)

No comments:

Post a Comment