Friday, July 16, 2010

पश्चाताप ...

अदभुत माझ्या भाळावरचे
वरदान वाटले मातेला
रे कुणी कितीक दिल्या आहुती
गवसल्या कितीक वेदना
चिरंजीव मी अश्वत्थामा
…… मज भय कसले ते मृत्युचे !
 
अस्वस्थ तप्त रुधिर द्रोणाचे
नकळत भुलले मायेला
अपराध कसे किती जाहले
नी जाहल्या अक्षम्य चुका
चिरंजीव मी अश्वत्थामा
…… मज नुरले भान विवेकाचे!

जगावेगळे ते प्रेम सख्याचे
का अंतरलो त्या करुणेला
जपले सदैव हे मैत्र फसवे
काय म्हणावे या सुह्रदा
चिरंजीव मी अश्वत्थामा
…… मज अनावर ओझे काळाचे!

विशाल

No comments:

Post a Comment