Thursday, July 8, 2010

चारोळी

प्रीती आणि अहंकार
भिन्न लिंगी असतात
म्हणुनच त्यांची नाती
फ़ार लवकर जुळतात !
**********************************
कधी उन्मादाच्या भरात
तिला चंद्राची उपमा देतो
विसरतो नकळत, चंद्रही
स्वत:च शापित असतो !
***********************************
चकोरालाच विचार
वाट पाहणं काय असतं?
चंद्रदेखील सांगेल …
हे त्यालाही जमलं नसतं !
************************************
आम्ही आजकाल
प्रार्थनाही करतो
नाहीच जमलं तर
आईला आठवतो …!
******************************
आम्ही रोज त्याला पाहतो
त्याने म्हणे देव पाहीला ….
आम्ही माणुसपण सोडले
आणि तो म्हणे संत झाला ..!
*********************************

No comments:

Post a Comment