Monday, July 12, 2010

मिलनवेळा…

रुजली मनात अलगद माझ्या
आतुर सखये ती साजणवेळा
दाटुनी आला मग गात्रांमधुनी
भाव प्रीतीचा मदमस्त आगळा
मज भान नुरे मग अस्तित्वाचे
मधु गंध प्रियेचा असे वेगळा
झंकारुनी स्वरतरंग प्रीतीचे
घालीती तरुवर गळ्यात गळा
व्याकुळले अन पंचप्राण मम
अनुभवण्या अति रम्य सोहळा
आर्त मनीचे मग झाले धुसर
येताच जवळ ती मिलनवेळा
विशाल

No comments:

Post a Comment