Thursday, July 8, 2010

स्वप्न आणि सत्य !

कधी उन्मादाच्या भरात
तिला चंद्राची उपमा देतो
विसरतो सोयिस्कररित्या…
चंद्र..
तो स्वत:च शापित असतो !
कधी प्रेमाने तिलाही
गंगेसम निर्मळ ठरवतो
तिथली आत्मार्पणं पाहून…
मी ही…
शुद्धतेच्या व्याख्या विसरतो !
तुला चांदण्यांची फुले आणु?
उत्साहाने स्वप्ने पाहतो …
तुरडाळ शहाण्णव रुपये किलो?
आम्ही दोघे…
वास्तवाच्या चक्रव्युहात अडकतो !
विशाल.

No comments:

Post a Comment