Thursday, July 22, 2010

धरतीचे गीत…

स्वार होवुनी मुक्त नभांवर
मी गीत गायले धरतीचे
सवे मिळुनी रे ये बळीराजा
फेडु पांग चल वसुधेचे
……… उपकार स्मरु या मातीचे !

कुशीत तिच्या रे मोती पिकती
बीज पेरु आपल्या घामाचे
रे पिकवु सोने हिरवे आता
फेडु ऋण धरतीमातेचे
………. उपकार स्मरु या मातीचे !

फुलवु हिरवाईने सर्व धरा
व्रत घेवु या काळ्या आईचे
कृषका जोड रे नांगर आता
डोहाळे पुरवु धरणीचे
……….. उपकार स्मरु या मातीचे !

तिज ह्रुदयी वसे आभाळमाया
कण वेचु तिच्या वात्सल्याचे
चल गड्या आज मिळुनी गावु
गीत नवे हे वसुंधरेचे
……….. उपकार स्मरु या मातीचे.

विशाल

No comments:

Post a Comment