Thursday, July 22, 2010

राधा ही बावरी…

तु पांघरशी नभ निळे
मज मोहवे वदन सावळे
खुळावले नयन जुळे
सख्या न माझे मला आकळे

लट भाळी केश कुरळे
पाहुनी ते मम चित्तही चळे
तुज पाहता अहं गळे
पान्हावली मुरली खुण कळे

यमुनातीरी आनंदमेळे
वृंदावन झाले आज बावळे
शाम सावळा रास खेळे
कामधेनु सोडी मुक्त आचळे

जाती घटिका आणि पळे
कालपाश अन कंठी आवळे
नाम तुझे मनी सावळे
हवा कशाला तो स्वर्ग ना कळे

विशाल

No comments:

Post a Comment