Thursday, July 8, 2010

चारोळी – २

ओठावर सुर होते
बोटावर ताल होते
एक तु नव्हतीस
जगणे कसे बेताल होते.

**********************************

तिने कधी वळुन
पाहिलेच नाही,
तिच्याकडे पाहण्याच्या नादात
हे कधी कळलेच नाही.

*******************************

डोळ्यांची भाषा मुळी
ओठांना कळत नाही,
म्हणुन मौनाची तिव्रता
शब्दांत असत नाही.

**********************************

तेजाळणार्‍या ज्योतीला
तिची जात विचारायची नसते,
ती देवापुढे पणती
तर सरणापुढे दिवटी असते.

*********************************

क्षितीजापाशी
सुर्याची पिल्ले रेंगाळली,
सागराच्या डोळ्यातही
अनोखी ममता जागली.

*********************************

माणसाचं असणं
दिसण्यात दिसत नाही,
म्हणुनच असण्याला
दिसण्याइतकं महत्व नाही.

*********************************

विशाल.

No comments:

Post a Comment