Tuesday, July 27, 2010

शक्ती…

तू माता, तूच कन्या
तू कांता सहचरी ..!

तू पृथा, तूच रसा
तू गंगा भागिरथी ..!

तू गऊ, तूच नंदिनी
तू काली संकटहारिणी ..!

तू दुर्गा, तूच कमला
तू माया आदिशक्ती ..!

तू ऋद्धी, तूच सिद्धी
तू विद्या माय सरस्वती ..!

तू स्नेह, तूच कारुण्य
तू तडिता सौदामिनी ..!

तू जिजाऊ, तूच लक्ष्मी
तू महिषासुर मर्दिनी ..!

तू भक्ती, तूच शक्ती
तू वात्सल्य ममतामयी ..!

तू तेज, तूचि सामर्थ्य
तू पावित्र्य मांगल्यमयी ..!

तू स्निग्ध, तू स्नेहार्द्र
तू आदिमाया तेजोमयी ..!!

विशाल

No comments:

Post a Comment