Thursday, July 22, 2010

लिलाव…

कुणीतरी ……
मला पण विचारा ना रे
मला काय हवंय ते !

निर्जीव …..
विकल्या जाणार्‍या
वस्तुंमध्ये नाहीये मी !

त्यांनाही …..
नाही जमले कधी
या गांधीला खरीदणे !

महाग …..
होता खुपच तेव्हाही
हा निष्कांचन म्हातारा !

एकटा …..
पडलोय मी आता
त्या कागदी तुकड्यांवर !

कंटाळा …..
येतो एकटे बसण्याचा
कार्यालयांच्या भिंतीवर !

नकोय …..
नोटेवरचा एकटेपणा
भिंतीवरचा अलिप्तपणा !

हृदयात …..
थोडीशी तुमच्या विचारात
हवीय जागा आचरणात !

विशाल

No comments:

Post a Comment