Tuesday, August 10, 2010

न्युड पोर्ट्रेट...

ती आजकाल माझ्याशी बोलतच नाही.
कधी कधी माझ्याबद्दल मात्र बोलते…
काल विचारलंच तिला…
माझी कविता वाचलीस?
……………….
……………………..
तर…..
तिच्या कपाळावर या एवढ्या आठ्या…..
कपाळावर आलेली बट तिने मागे सारली…
जवळ जवळ ओरडलीच…..
“आजकाल कसली कसली न्युड पोर्ट्रेट्स काढतोस रे?”
मानवाच्या फसकलेल्या नितीमत्तेची…
टरकलेल्या चारित्र्याची…. आणि सदैव कोड्यात पाडणार्‍या कडवट सत्याची?
असं नको रे करू राजा….
पोपट मेला आहे म्हणुन सांगायचे दिवस गेले आता….!

 विशाल

No comments:

Post a Comment