Thursday, August 19, 2010

सांगू कसे तूज....? का नकळे हे उमजत नाही मला......

********************************************************************************

बसलो असता वर्गामध्ये इंग्रजीच्या एकदा,
तिला पाहिले डोळे भरुनी नकळत माझे मला,
प्रिय सखी ती माझी होती वाटायचे मजला,
हळुच पाहता केशसंभार रेशमी खांद्यावर रुळलेला,
मन माझे मला म्हणाले.....,
ती माझी होइल का?
तिला न कळले मात्र कधीही, भाव मम हृदयीचे
परि उमजले सारे मजला, सार तिच्या मनीचे...
वर्ग संपला..., हरिणगतीने आली माझ्याकडे,
मला म्हणाली...
राहीला स्वाध्याय कालचा, मदत हवी रे मला..
मित्र तिचा मी, मग नाही म्हणणे कसले...?
हळुच हसली कृतज्ञतेने गालातुनी ती सुखे...
मनी वाटले सांगावे तीज, कळावे हलकेच तिला
नसे तुझा मी मित्र केवळ ...,
नच केवळ तो सखा..
होऊ पाहतो प्रियकर सखये..., जन्मो जन्मी तूझा..
का नकळे ते उमजत नाही ...
सांगता तूज आडवी येते लज्जा !

फोन वाजला अवचित, ती होती माझी प्रिया
हुंदके तियेचे आले कानी, स्फुंदत म्हणाली मला..
ते क्षण संपले मम प्रेमाचे,
भंगले हृदय आज रे मित्रा
छळतो एकांत असा हा, तू सोबतीस रे येशील का?
मित्र तिचा मी, नाही म्हणणे कसले...
क्षणात उडाले पक्षी मनाचे तिजला भेटावया
तिच्यासमोरी बसुनी पाहीले तिज ओल्या नयना..
मन वेडे पुन्हा म्हणाले... ती माझी होइल का?
क्षण थोडे मजसवे घालवूनी...
निघाली देवून मज एकांत तिचा...
कृतज्ञतेने हसूनी म्हणाली...,
आधार तुझा झाला...
मनी वाटले सांगावे तीज, कळावे हलकेच तिला
नसे तुझा मी मित्र केवळ ...,
नच केवळ तो सखा..
होऊ पाहतो प्रियकर सखये..., जन्मो जन्मी तूझा..
का नकळे ते उमजत नाही ...
सांगता तूज आडवी येते लज्जा !

एका रम्य दिनी मज भेटली माझी प्रिया
सखा तिचा नव्हता, तिज सवे साथ द्यावया..
म्हणाली तू येशील का?
मी ही होतो अजूनी एकटा...
वदलो अन प्रियेला...
करार आमचा ठरला....
नसेल जर कोणीही सवे..., साथ बरा अपुला !
हळुच हसली, सुखे म्हणाली ...
तू मित्र खरा रे माझा, जन्मो जन्मी हवा...
त्या सुखद संध्याकाळी,
क्षण हळूवार उडूनी गेला...
निरोप घेता सुखे तियेचा....,वदली हसुनी मला,
"हा काळ सुखाचा मम आयुष्यामधला तुझ्या सोबतीतला!"
मनी वाटले सांगावे तीज, कळावे हलकेच तिला
नसे तुझा मी मित्र केवळ ...,
नच केवळ तो सखा..
होऊ पाहतो प्रियकर सखये..., जन्मो जन्मी तूझा..
का नकळे ते उमजत नाही ...
सांगता तूज आडवी येते लज्जा !

क्षण गेले..., सरले...!
खगांसवे उडाले ते दिवस सहवासांचे,
क्षण निरोपाचा समीप येता काळीज हुरहुरले...,
सखी प्रिया ती दृष्टी पडता गात्रे सुखावली,
सुंदर ती मृगनयना मज अप्सरा भासली...
येवूनी जवळ हलकेच स्फुंदली..,
मिठीत माझ्या क्षण विसावली,
अश्रु नयनी तिच्या... हळुवार बोलली,
"आठवशील तू सदा, तू मित्र माझा खरा...,"
मनी वाटले सांगावे तीज, कळावे हलकेच तिला
नसे तुझा मी मित्र केवळ ...,
नच केवळ तो सखा..
होऊ पाहतो प्रियकर सखये..., जन्मो जन्मी तूझा..
का नकळे ते उमजत नाही ...
सांगता तूज आडवी येते लज्जा !

दिवसामागुनी दिवस गेले...
आली परीक्षेची वेळा,
हाती माझ्या अवचित पडली तिची लग्न पत्रिका,
मित्र तिचा मी, नाही म्हणणे कसले...,
मला पाहता सुखावूनी गेली...,
रुद्ध गळ्याने मला म्हणाली...,
येणार तू ही खात्री होती मला...,
मनी वाटले सांगावे तीज, कळावे हलकेच तिला
नसे तुझा मी मित्र केवळ ...,
नच केवळ तो सखा..
होऊ पाहतो प्रियकर सखये..., जन्मो जन्मी तूझा..
का नकळे ते उमजत नाही ...
सांगता तूज आडवी आली लज्जा !

मृत्यू

न टळला कधीही कुणाला,
मम प्रियेलाही घेवून गेला...,
अखेरच्या क्षणी अन तिला पाहता श्वास मम रुंधला,
अनुदिनीच्या अन पानावरती....
कधी तिनेही, मांडली होती वेदना....,
मनी वाटते सांगावे त्यासी,
कळावे हलकेच तुला...
नच माझा तू मित्र केवळ ...,
नच केवळ तो सखा..
होशील का रे प्रियकर सखया...,
जन्मो जन्मी तू माझा..
का नकळे ते माहीत नाही ...
पण सांगता तूज आडवी येते लज्जा !
तू तरी वेड्या असा कसा रे, मुग्ध राहशी कसा?
एकदा तरी बोल ना ...., सखे तू माझी होशील का?

"आता वाटते हवे, सांगायाला होते तेव्हा तूला....,
मन माझे आक्रंदले वेड्या तू असा रे कसा? "

जिवन मित्रा प्रेमासाठी,
श्वास असावा प्रेमासाठी..
हृदयात हवे अन प्रेमची केवळ,
कशा हवे अहंकार असा...?
मनात केवळ ध्यास प्रियेचा, अन ओठी तिचेच नाव हवे...
तू सोड मोह या स्वप्न फुलांचा...
वास्तवाचे अन भान हवे...!

********************************************************************************काल इमेलवर मला एक चेन मेल आली होती. तशी यापुर्वीदेखील बर्‍याचदा आली होती हि मेल. पण यावेळी का कोण जाणे मला ती मराठीत लिहावीशी वाटली.
चेनमेलमधुन आलेली हि मुळ कविता ...
I Couldn't tell her, Don't know why!!!!……………………………
First Year:
As I sat there in English class,
I stared at the girl next to me.
She was my so called 'best friend'.
I stared at her long, silky hair,
and wished she was mine.
But she didn't notice me like that,
and I knew it.
After class,
she walked up to me and asked me for
the notes she had missed the day before.
I handed them to her.
She said 'thanks'
I want to tell her, I want her to know
that I don't want to be just friends,
I love her but I'm just too shy,
and I don't know why.
Second Year:
The phone rang. On the other end,
it was her. She was in tears,
mumbling on and on about how
her love had broke her heart.
She asked me to come over
because she didn't want to be alone, So I did.
As I sat next to
her on the sofa,
I ! stared at her soft eyes,
wishing she was mine.
After 2 hours, one Drew Barrymore movie,
and three bags of chips,
she decided to go home.
She looked at me, said
'thanks'
I want to tell her,
I want her to know that
I don't want to be just friends,
I love her but I'm just too shy,
and I don't know why.
Third year:
One fine day she walked to my locker.
"My date is sick" she said,
"Hess not gonna go" well,
I didn't have a date, and in third year,
we made a promise that
if neither of us had dates,
we would go together just as 'best friends'.
so we did.
That evening, after everything was over,
I was standing at her front door step.
I stared at her as She smiled at me
and stared at me with her crystal eyes.
then she said- "I had the best time, thanks!"
I want to tell her,
I want her to know
that I don't want to be just friends,
I love her but I'm just too shy,
and I don't know why.
Final year:
A day passed, then a week, then a month.
before I could blink, it was graduation day.
I watched as her perfect body
floated like an angel
up on stage to get her degree.
I wanted her to be mine-but
she didn't notice me like that, and I knew it.
Before everyone went home,
she came to me in her smock and hat,
and cried as I hugged her.
Then she lifted her head from my shoulder
and said- 'you're my best friend,
thanks'
I want to tell her,
I want her to know
that I don't want to be just friends,
I love her but I'm just too shy,
and I don't know why.
Marriage:
That girl is getting married now.
and drive off to her new life,
married to another man.
I wanted her to be mine,
but she! didn't see me like that,
and I knew it.
But before she drove away,
she came to me and said 'you came !'.
She said 'thanks'
I want to tell her,
I want her to know
that I don't want to be just friends,
I love her but I'm just too shy,
and I don't know why.
Death:
Years passed, I looked down at the coffin
of a girl who used to be my 'best friend'.
At the service, they read a diary entry
she had wrote in her college years.
This is what it read:
"I stare at him wishing he was mine;
but he doesn't notice me like that,
and I know it.
I want to tell him,
I want him to know that
I don't want to be just friends,
I love him but I'm just too shy,
and I don't know why.
I wish he would tell me he loved me !
.........'I wish I did too...'
Life is to love ,
Heart is to love,
The world is only to love,
So lets love without ego,
Lets express our true self,
Lets all be THE WINNERS in the WORLD OF LOVE.

विशाल

No comments:

Post a Comment