Monday, August 23, 2010

विचारू नका...

कोण मी मलाच हे विचारू नका
आज मी जिवंत कां विचारू नका…

मारुनी स्वतःस मी निष्पाप कसा?
आसवांचे अर्थ मला विचारू नका…

कां असा सुखांचा मार्ग बदलला?
वेदनांचा पत्ता मला विचारू नका…

तो सुर्य, चंद्र..,तारकाही गळाल्या
क्षितीजाचा गाव मला विचारू नका…

कोमेजल्या कळ्या कां चित्रातल्या ?
फिकुटले रंग मला विचारू नका …

हरवला भाव सांगा कुणा गवसला?
सोडला ठाव, कां? मला विचारू नका….

विशाल

No comments:

Post a Comment