Monday, August 23, 2010

नुतन वर्षाभिनंदन

मनामनाच्या छेडूनी तारा
गीत गावे रोज नवे
धुक्याचा भेदून पडदा
सोनकिरण निघावे रोज नवे !

मिटलेल्या पापणीत
स्वप्न पाहावे रोज नवे
स्वप्नामधले पाहूनी तराणे
हास्य उमलावे रोज नवे !

आनंदमय या सोहळ्याने
नववर्ष साजरे व्हावे
नववर्षाच्या तेजामधूनी
सुख-समृद्धीचे सूर निघावे !

विशाल