Tuesday, August 3, 2010

मी ...

मज वाटे धर्म मी
संस्कृतीचे मर्म मी
कथिले भगवंताने
ते वांछित कर्म मी


मज वाटे मूळ मी
कर्तव्याचे फुल मी
टिपलेली धरित्रीने
पाचोळ्याची धूळ मी


मज वाटे चंद्र मी
मार्तंड तो सुर्य मी
जपणारे अंध धर्मा
आततायी शौर्य मी


अस्मितेचा विचार मी
अतिरेकी आचार मी
जोपासतो मतांधता
अभिमानी विकार मी


स्वत्व मी, संस्कार मी
फसलेला आकार मी
सरलेले ते द्वैत सारे
उरलो निराकार मी


विशाल

No comments:

Post a Comment