Tuesday, August 3, 2010

माझी गाथा ...

लपवणे ते झाले सुरू
माझेच माझी यातना
राम न उरला काही
आरंभीच संपली कथा !

नसे अभंग नामयाचा
नच विरहिणी मीरेची
साकळली वेदना सारी
मी रचितो माझी गाथा !

विसरल्या सार्‍या श्रुती
अश्रुत भिजल्या आर्या
जखमा सार्‍या ओल्या
घोकतो जुन्याच संथा !

ना स्मरे मंत्र आता
ना आठवते हरिनाम
वेदनांचे हे वेद माझे
विसरल्या जुन्या प्रथा !

हे भोग मम प्राक्तनीचे
नकोत पळवाटा नव्या
संपते जिथे दु:ख जुने
जन्मा येते नवी व्यथा !

विशाल

No comments:

Post a Comment