Tuesday, August 10, 2010

भग्न ...अक्षरावरून आठवलं…
माझी कविता वाचून तु मोहरायचीस…
तुझ्या मधाळ स्वरात म्हणायचीस…
अगदी कोरीव लेण्यांसारखी आहेत…,
……………………….अक्षरे तुझी !

मग अगदी हळुवारपणे हात फिरवायचीस..
त्या नि:शब्द तरीही बोलक्या कागदावरून…
इतकं प्रेम करतोस माझ्यावर…,
………………….. या कवितेएवढं ?

तुला माहितीये..?
सार्‍या अंगावरून मोरपीस फिरल्यासारखे वाटायचे…
हम्म्म…, आता खुप आक्रमणे झाली आहेत…
मुळ वास्तुच खिळखिळी झालीय गं….
……..अक्षरशिल्पांचं काय घेवून बसलीस…?

आमची प्रेरणा :श्री. गिरीश कुलकर्णी यांची अक्षर : http://www.maayboli.com/node/14557

विशाल

No comments:

Post a Comment