Tuesday, August 3, 2010

व्यसन…!


मागच्या ३१ डिसेंबरला
गहिवरला होतास तू….
शेवटचा पेग संपवताना
डोळा मारून म्हणाला होतास तू ,
हा पेग आता शेवटचाच बरं का…!
मागच्या ३१ डिसेंबरला
कुजबुजला होतास तू
डोळ्यात तिच्या पाहून
कानात माझ्या बोलला होतास तू ,
आता पुढच्या वर्षी दुसरी बरं का…!
मागच्या ३१ डिसेंबरला
संकल्प केला होतास तू
आता माबोवर येणे बंद
विपूत माझ्या टपकला होतास तू ,
दुसरं संस्थळ शोधणार बरं का…!
३१ डिसेंबर परत आलाय
मधुशाला विसरलास तू
वपु घेवून बसलाहेस
’ती’ ही बहुदा बदलली आहेस तू.,
कवितेचं व्यसन मात्र तसंच बरंका…!

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

विशाल कुलकर्णी.

No comments:

Post a Comment