Tuesday, August 3, 2010

मत्सर...

चांदण्याने ओंजळ भरली
चंद्र नयनी सामावला
मत्सराने धुमसणारा, तो…
सुर्य सखे मी पाहीला

पसरले पंख मयुराने
उन्मुक्त सुखे तो नाचला
थांबला नभी खगराज
पाहता नर्तन कोमेजला

विठ्ठल विठ्ठल निनाद पंढरी
भागवतींचा हर्ष गर्जला
कमरेवरती हात ठेवूनी
विठू सावळा हिरमुसला

तुझे आहे ते तुझ्याचपाशी
हेवा मना हवा कशाला?
तुझ्यासारखा तुच राजा
मत्सर का मनी आला !

विशाल.
०२/१२/२००९

No comments:

Post a Comment