Monday, August 23, 2010

ओढ ....!

क्षणात हसले क्षणात रुजले,
वसंता तूझे गीत कोवळे..
दंवे सुखाने तृणही रमले,
कळ्यात हळवे भ्रमर गुंतले !

प्राजक्त फुले गंध दरवळे,
फुलूनी आली बकुळफूले..
गुलाब गाली ओज झळकले,
समीरानेही अंग झटकले !

माळरानी रानफुल एकले,
त्यानेही तव गीत ऐकले..
तोर्‍यात उभी निशिगंधा बोले,
मला सख्याचे वेड लागले !

हळुवार तुझी चाहूल वसंता,
बघ वसुधेने बाहू पसरले ..
विरह व्याकुळ प्रिया जणू ,
भेटाया तुज मन आतूरले !

विशाल

No comments:

Post a Comment