Monday, August 23, 2010

का..?

*****************************************

का मनाला वेड असावे स्वप्नांचे?
का चांदणे फुलावे मनात शुभ्र क्षणांचे?
का सावल्यांनी विसरावे सोबत असण्याचे?
जागताना हलकेच स्वतःवर हंसण्याचे…
का सोडावे आसवांनी गालावर रेंगाळण्याच्रे?
का नसावे भान हसण्या, ओठातून पाझरण्याचे?
का ऐश्वर्य सरावे आठवांचे, तूझ्या मनोहर रुसव्याचे?
पुढे पुढे जाताना….
का विसरावे तू मागे वळून बघण्याचे ?

*******************************************
विशाल

No comments:

Post a Comment