Monday, September 20, 2010

चारोळी - ४

नंदनवनात हिंसाचाराचा
नेहमीच नंगानाच आहे...
लढणार्‍या जवानाला मात्र
मानवाधिकाराचा जाच आहे !

********************************************

त्यांच्या हातात हँडग्रेनेड...
आमच्या...., निषेधाचा खलिता आहे
त्यांच्या रक्ताला नेहमीच भुतदया
आमच्या...., पेटता पलिता आहे...!

************************************************

काळं काय पांढरं काय?
सारी षंढपणाची कमाल आहे...
आमच्या नसांमध्ये पाणी,
त्यांचं रक्त तेवढं लाल आहे...

*********************************************************

2 comments:

  1. ब्लॉग छान आहे...आणि कविताही

    ReplyDelete
  2. धन्यवाद मित्रा :)

    ReplyDelete