Wednesday, September 8, 2010

छत्री …

अमित जी ची छत्री ही सुंदर कविता वाचली अन राहवलं नाही….

पाऊस आला..
हलकेच मी छत्री उघडली..
अन नजर तुझी फुरंगटली..
वेडाच आहेस…!
अरे शहाण्या…
तुझ्या मिठीत भिजण्याची मजा
त्या छत्रीला कशी कळणार?
पावसाच्या स्पर्शाने शहारलेलं..
ओलेतं अंग मग तूला कसं बिलगणार…?
माझ्या डोक्यावर पडणारे…
पाणी अडवण्याच्या बहाण्याने अलगद..
तू माझे ओलेकच्च केस कसे स्पर्शणार?
पाऊस..तर निमित्त रे केवळ…
तुझ्या जवळ येण्याचं
त्या छत्रीखाली ते कसं जमणार?
तिथे तू मला आणि मी तूला..
पाऊस लागू नये म्हणून धडपडणार..!
त्या नादात…
तूझ्यासवे भिजण्यातली..
रंगत मात्र हरवणार…
नको रे…
चल मिट ती छत्री…
तुझा हात माझ्या हातात…
अन् धुंद करणारी रंगेल बरसात…
त्या सोबत भिजण्यातली…
मजा काही वेगळीच असणार…

विशाल

No comments:

Post a Comment