Thursday, September 23, 2010

Conditions apply ....

यदा यदा हि धर्मस्य
ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य
तदात्मानं सृजाम्यहम्॥
परित्राणाय साधूनाम्
विनाशाय च दुष्कृताम्।
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे॥

जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येइल...
तेव्हा तेव्हा मी परत अवतार घेइन...

तु सांगितलं होतंस रे कृष्णा...
पण विसरलास ना....?
conditions apply चा क्लॉज टाकायला...!

विसरलास रे देवा...
धर्माची तुझी व्याख्या सांगायला,
आम्ही अडकलोय..
हिंदु-मुस्लीम अन शिख, इसाईच्या फसव्या चक्रव्युहात

का नाही सांगितलीस तेव्हा...?
व्याख्या ....
मानवतेची ....
तुला अभिप्रेत असलेल्या माणुसधर्माची...?

विशाल कुलकर्णी

No comments:

Post a Comment