Tuesday, October 19, 2010

चारोळी - ७

अलगद तुझ्याही नकळत
तु माझ्यासवे निघालीस...
मला सांग त्यानंतर
तु स्वतःची किती राहिलीस?

*********************************

जगण्यासाठी माणुस
कसकसले समझौते करतो
मृत्यु हिच खरी मुक्ती, तरी
नेमका त्यालाच टाळू पाहतो....

********************************* 

स्वप्नपुष्पे उमलताना
मी पाहिलीच नव्हती
स्वप्ने माझी, माझ्याच
पहाटेने चुरगाळली होती...

********************************* 

शब्द शब्द तोलताना
ओठ निर्जीव झाले
मौनाला अर्थ आला
अन डोळे ओलावले...

********************************* 

उगीचच हाक मारली
वळणावर शेवटच्या वळताना...
जाणवली दुर्बलता शब्दांची
त्याक्षणी तूला गमावताना....

*********************************

ओठावर सुर होते
बोटावर ताल होते...
एक तू नव्हतीस तर
जगणे कसे बेताल होते....

********************************* 

एकाक्ष असला
तरी तो काक आहे....
पिंडाला शिवण्यापुरता
तरी तो बाप आहे....

********************************* 

पृथ्वीच्या पोटात
ज्वालामुखी दडलेला...
जणु सारा विखार
पृथेने पोटात लपवलेला...

*********************************

विशाल कुलकर्णी

No comments:

Post a Comment