Thursday, October 28, 2010

चारोळी - ९

तिची वाट पाहणे
माझ्या डोळ्यांनी सोडले नाही
तिने मात्र कधीही
मागे वळूनही पाहीले नाही...

तिने कधी वळून माझ्याकडे
पाहीलेच नाही
तिच्याकडे पाहण्याच्या नादात
कळालेच नाही

माझं सारं जगणं
तुझ्या अस्तित्वाने भारलेलं
म्हणुनच तुझ्यासमोर येणं
मी नेहमीच टाळलेलं...

तुला आठवतं...?आपलं...
ते कॅंटीनमध्ये भेटणं...
सिगारेटच्या खोट्या ठसक्यात
माझं आसवं लपविणं....

जगणं किती सुसह्य होतं
जेव्हा तू होतीस...
आता मृत्युचीही भीती वाटते
कारण तूझी साथ नाही....

माझं असणं तुझ्या
हंसण्यात चिंब भिजलेलं
तुझं असणं माझ्या
रोमरोमी पक्कं भिनलेलं...

तुला आठवताना तुझं
गोड हंसणं आठवलेलं
तुला विसरताना कायमचं
माझं हसणंच हरवलेलं....

तुझं अलगद येणं
माझ्या जाणिवांनी टिपलेलं
तुझं नकळत जाणं
माझ्या डोळ्यांनाही कळलेलं...

No comments:

Post a Comment