Thursday, October 28, 2010

चारोळी - १०

डोळ्यांची भाषा मुळी
ओठांना कळत नाही
म्हणुन मौनांची तिव्रता
शब्दात असत नाही

हिरवाई तारुण्याची कधी
स्मृतीतून साठवली होती
त्यातच माझ्या एकलेपणाची
करुणाई सामावली होती

तुझं असणं
मनात साठवलेलं
तुझं हसणं मला
रडताना आठवलेलं...

तेजाळणार्‍या ज्योतीला
तिची जात विचारायची नसते
ती देवापुढे पणती ...
तर सरणापुढे दिवटी असते...!

स्वप्नातले महाल
रत्नजडीत असतात
वास्तवाच्या झोपडीला
वेदनांचे टेकु असतात...

आईच्या वात्सल्याची
देवालाही इर्षा वाटते
मग पंढरीच्या विठुची
वत्सल विठाई होते...

फुललेलं फुल पाहून
कळी मनोमन उसासली
निर्माल्यावस्था पाहून
उगाचच सुखावली...

आयुष्याच्या
आंधळ्या भोवर्‍यात
धुंदावलोय मी..
तुझ्या अधीर डोळ्यात...

क्षितीजापाशी
सुर्याची पिल्लं रेंगाळली
सागराच्या डोळ्यातही
अनोखी ममता जागली...

शरण जाणं मुळी
माझ्या स्वभावातच नाही
गेलंच तर मृत्युला..
जीवनाला, मुळीच नाही !

No comments:

Post a Comment