Monday, November 1, 2010

मुक्त ....

झुललो सदैव तुझ्याच सवे
आता तसा झूलणार नाही
कशास नसते स्वातंत्र्य हवे?
आश्वासनांस फसणार नाही...

गायलो तूझे हर गीत सखे
आता पुन्हा फूलणार नाही
फिरुनी आले थवे आठवांचे
पुन्हा नव्याने रडणार नाही ....

नकोसे आता ताटवे फुलांचे
काट्यात तसा रमणार नाही
पुरे जाहले शोधणे संदर्भ नवे
जुन्या क्षणांना स्मरणार नाही...

मी शोधतो ते चांदणे अंतरीचे
काजव्यांस तसा भूलणार नाही
विसरलो सारे नियम जगाचे
पुन्हा जिवनीं अडकणार नाही...

No comments:

Post a Comment