Monday, December 13, 2010

चाहूल...

टाळून जीवनाला हसण्यात अर्थ नाही
जाळून या जिवाला जगण्यात अर्थ नाही

येतोच तो तसाही ती वेळ जाहल्यावर
ताडून ते बहाणे बघण्यात अर्थ नाही

ऐकून ती जगाची रुदने असह्य झाली
हासून मग फुकाचे फसण्यात अर्थ नाही

मी जाणतो तुलाही हसणे अशक्य नाही
ढाळून आसवांना लपण्यात अर्थ नाही.....

मृत्यो तुझा सुगावा..., डरणे अतर्क्य नाही
भोगून सुख विशाला, रमण्यात अर्थ नाही

विशाल...

2 comments:

  1. मी जाणतो तुलाही हसणे अशक्य नाही
    ढाळून आसवांना लपण्यात अर्थ नाही.....


    aawadali ...

    ReplyDelete