Wednesday, January 12, 2011

वास्तव...

तू भेटतेस ना...
तेव्हा चंद्र - तारे आठवतात..
मग चांदण्यांच्या मैफिली सजतात,
नक्षत्रांची आरास मांडली जाते...
रंगवली जातात स्वप्ने सेलिब्रेशन्सची...
.....
.......
तू जवळ असतेस...
तुझ्याजवळ येण्याच्या नादात,
मी स्वतःपासून दुर जात असतो....!
.....
........
तुझं हसणं, तुझं बोलणं....
पायाच्या अंगठ्याकडे बघत तुझं ते लाजणं...
......
........
सगळ्या सीमारेषा ओलांडून
मीही नव्या जगात शिरतो....
भुतकाळाचे सो कॉलड् यशस्वी संदर्भ जपत...
वर्तमानाची कटूसत्ये जाणीवपूर्वक विसरत...
तुझ्याबरोबर...
फसव्या भविष्याची स्वप्ने बघायला लागतो....!
....
....
निरोप घेवुन तू निघतेस...
मी फाटक्या आभाळाची ठिगळे शोधायला लागतो...!

विशाल...

2 comments: