Thursday, February 10, 2011

राम नाही ....

कुठेही मनाच्या पसार्‍यात राम नाही,
बहाणेच सारे…, दिलाशात राम नाही !

सुखाचे जरी हे पुरावे हजार हाती,
कुठे हो खरे ते? पुराव्यात राम नाही !

किती हे इशारे फुलांचे खुणावणारे,
जराही खुणांच्या भुलाव्यात राम नाही

बिछाने फुलांचे…, सुखांचे उपाय काही?
रुतावे कळ्यांनी विसाव्यात राम नाही !

नको चांदणे, चंद्र वाटे नकोनकोसा
अता चांदण्यांच्या दिमाखात राम नाही !

हसावे, रडावे, मनासारखे करावे
कुणा का भजावे? कुणाच्यात राम नाही!

कराव्या चुकाही, खुलासे कुणी करावे
नरो कुंजरो वा! खुलाशात राम नाही!

विशाल...

2 comments:

  1. आपल्या कवितेत मात्र नक्कीच राम आहे......

    ReplyDelete
  2. मन:पूर्वक आभार इंद्रधनु :)

    ReplyDelete