Thursday, February 24, 2011

हवीच वेदना विराजमान एकदा तरी ...

हरून या रणात देहभान एकदा तरी
ठरेन या जगात मी,महान एकदा तरी

अजूनही मनात ती जुनीच प्रीत जागते
हवीस तू मिठीत या निदान एकदा तरी ...

असेन मी, नसेन मी, मनातही तुझ्या सखे
हळूच आज हाक दे किमान एकदा तरी ...

हव्या कशास वल्गना उगाच रे जिवा अता ?
पहायचे तुला गड्या स्मशान एकदा तरी ...

सुखेच ती, सुखांस रे कळे न दु:ख काय ते,
हवीच वेदना विराजमान एकदा तरी ...

********************************
थोडी गंमत...

कलिंदनंदिनीसवे बराच खेळ खेळलो
विशाल मी, म्हणा मला, महान एकदा तरी...! फिदीफिदी

विशाल....

No comments:

Post a Comment